विजय वहाडणे

अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक-पिस्तूल परवान्यांचीही झाडाझडती घ्या -विजय वहाडणे

0 5 4 0 3 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

बीड जिल्ह्यातील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष-संताप व्यक्त केला जात आहे.धर्म-जात यांचा विचार न करता संपूर्ण समाज याविरोधात एकवटलेला दिसतो आहे. भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे व राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर बंदूक परवाने दिलेले आहेत असे निदर्शनास येत आहे.आता खरे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील दिलेले बंदूक परवानेही स्थगित ठेवून सर्वच परवान्याची पुनःश्च पडताळणी करणे गरजेचे आहे.असे केल्याने चुकीच्या-अपात्र व्यक्तींना दिलेले बंदूक परवाने रद्द करता येथील.गुन्हे घडण्याची वाट न पाहता आधीच खबरदारी घेतली तर गुन्हेगारी -गुंडगिरीस नक्कीच पायबंद बसू शकतो.आपल्या जिल्ह्यातही अधिकृत व अनधिकृत बंदूक-पिस्तुले-कट्टे असणारच यात शंकाच नाही.

जाहिरात
जाहिरात

कोपरगाव तालुक्यात व शहरातही अनेकदा गोळीबाराचे प्रकार घडलेले आहेत. काही महाभागानी तर प्रसिद्धी व राजकीय स्वार्थासाठी स्वतःच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचे बोगस प्रकार घडवून कोपरगाव शहराला वेठीस धरल्याचे नागरिकांना आठवतच असेल.आणी म्हणूनच सर्वांच्याच हितासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वच बंदूक परवान्याची त्वरित पडताळणी व्हावी हिच अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 3 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
23:54