समता

समता पतसंस्थेने यावर्षा अखेरीस एक हजार कोटीचा उच्चांक गाठला:- संदीप कोयटे (संचालक)

0 5 3 7 0 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून १ हजार ९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी, खाजगी, सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे. ग्रामीण भागात १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४ ची वर्षा अखेर आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.संस्थेच्या ठेव वाढीविषयी अधिक माहिती देताना जेष्ठ संचालक जितुभाई शहा म्हणाले की, समता पतसंस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.८१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३८ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे. समताने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठून विक्रम केला आहे.१९९४ या वर्षी १ कोटी रुपयांच्या ठेवी समताने संकलित केल्या होत्या. १९९९ ला १० कोटी, २०११ ला १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला होता. तर ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ३० डिसेंबर २०१९ ला पार करून आर्थिक क्षेत्रामध्ये झेप घेतली होती. त्या नंतर ३१ डिसेंबर २०२४ या वर्षा अखेरीस १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे.अधिक माहिती देताना संचालक संदीप कोयटे म्हणाले की, ३१ डिसेंबर २०२४ अखेर समता पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय १७७१ कोटी ४२ लाख इतका झाला असून सभासद संख्या ९५ हजार १११ इतकी आहे.

३१ मार्च २०२५ पर्यंत आम्ही १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु समता पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने व ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे ३१ डिसेंबर २०२४ लाच १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून १ हजार ९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

ठेवी १ हजार ९ कोटी रुपये इतक्या झाल्या असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. ७६३ कोटी १९ लाख रुपये कर्ज वितरण केले असून २५३ कोटी रुपयांची अति सुरक्षित गुंतवणूक केली आहे. एकूण कर्ज वाटपात जगात सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज वाटप ४६८ कोटी रुपये इतके आहे. अधिकाधिक सुरक्षित कर्ज वाटपामुळे समता पतसंस्था सरकारी, खाजगी, सहकारी बँकांपेक्षाही अधिक सुरक्षितता ठेवीदारांच्या ठेवींना प्रदान करत आहे. एकूण कर्ज वाटपापैकी ६१ टक्के कर्ज वाटप जगातल्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्जाचे केलेले आहे.केवळ १५ शाखांच्या माध्यमातून प्रति शाखा सरासरी ६६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा करणे हा देखील राज्यात विक्रम ठरलेला आहे. प्रति शाखा तब्बल ११८ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय करून कमीत कमी शाखांमध्ये जास्तीत जास्त संमिश्र व्यवसाय करणारी समता पतसंस्था महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग,एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस., व्हाउचरलेस बँकिंग, आदींसह जेष्ठ सभासदांना घरपोहच पेन्शन योजना आदी प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत.समता पतसंस्था सहकार, आर्थिक क्षेत्रात विविध विक्रम करत असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. विशेषतः समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक व सामाजिक संस्था देखील नेहमीच अग्रभागी राहून कोपरगावकरांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. सामाजिक जाणिवेतून समताने सामाजिक कार्यात नेहमीच तत्परता दाखविली आहे. समताला होणाऱ्या नफ्याचा विनियोग नेहमीच सामाजिक कामाकरीता केला जातो. सामाजिक जाणिवेतून समताने कोपरगाव शहरात सहा मंदिरे उभारली आहे. परंतु ही मंदिरे देव देवतांची नसून मानवतेची, सहकाराची, सामाजिकतेची जाणीव असणारी मंदिरे आहेत. समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालय हे ‘सहकार मंदिर’ आहे. या मंदिरात ग्राहकांना पत निर्माण करून देणे. ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान केली जाते. ‘सहकार उद्योग मंदिरा’ त गावातील महिला बचत गटातील महिला येऊन अगरबत्ती, मेणबत्ती, कापूर, पेटिकोट तयार करतात. कोपरगाव शहरातील ‘माणुसकीच्या मंदिरा’ त गावातील लोक वापरलेल्या चपला, कपडे, बॅगा, औषधे आणून देतात.

जाहिरात
जाहिरात

या वस्तू सर्वसामान्य, गरजू माणसांना ज्यांना हव्या असतील त्यांना मोफत दिल्या जातात.कोपरगाव शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अभ्यासासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या सहकार्याने समता पतसंस्थेने ‘समता अभ्यास मंदिर’ सुरू केले आहेत. या मंदिरात तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं – मुली अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहून आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करीत आहेत. जे योग प्रेमी, सर्वसामान्य जेष्ठ तरुणांना योगाभ्यास करता यावा. त्यासाठी ‘योग मंदिर’ सुद्धा खासदारांच्या मदतीने सुरू केलेले आहेत. तसेच शिर्डी येथील ‘साई आश्रया मंदिरा’ त १५० च्या वर निराधार, अनाथ, गरजू मुले – मुली व ७० वयोवृद्ध आनंदाने राहत आहेत. गणेश दळवी हे या मंदिराची देखभाल करत असतात. समता पतसंस्था आणि सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटनांबरोबर काम करताना समता पतसंस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आदींचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.या बैठकीला संस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, अरविंद पटेल, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, दिपक अग्रवाल संचालिका सौ.शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाच्या एच.आर.उज्वला बोरावके यांनी केले. उपस्थितांचे आभार ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे