भीमा कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी यंदा 20 लाख अनुयायी येण्याची शक्यता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायी यांच्यासाठी प्रशासनाने यंदा दरवर्षी पेक्षा दोन रांगा व दोन रॅमची व्यवस्था अधिक वाढवली असून महिला अनुयायांसाठी स्वतंत्र रांगेचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे अनुयायांची जास्त गर्दी होणार नाही व त्यांना सुखकर अभिवादन करता यावे यासाठी या रांगेची व्यवस्था केली आहे तसेच अनुयायांच्या सुरक्षेतेसाठी 30 डिसेंबर पासूनच पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे 1 जानेवारीला देशभरातून अभिवादनासाठी लाखो अनुयायी येतात त्यांच्यासाठी प्रशासनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे यावर्षी या कार्यक्रमासाठी प्रशासनाने साडे चौदा कोटी रुपये खर्च केला आहे तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन 1 जानेवारी 2027 रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने पुढील दोन वर्षांनी या अभिवादन कार्यक्रमासाठी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून 45 ते 50 लाख अनुयायी येण्याची शक्यता असल्याने यंदाची तयारी ही 2027 च्या कार्यक्रमाची रंगीत तालीम असल्याचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन व समन्वयक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तसेच बाहेरून येणाऱ्या अनुयायांना कुठलाही त्रास होऊ नये विशेषतः महिला, मुली, लहान बालक सुरक्षित रहाव्यात यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे पुणे व परिसरातील अनुयायांनी 31 जानेवारी रोजी रात्री 12.00 ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत अभिवादनासाठी यावे जेणे करून देशभरातून येणाऱ्या अनुयायांना दिवसा अभिवादन करणे सुखकर होईल तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राहुल डंबाळे व माजी महापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केले आहे यावेळी पेरणे गावच्या सरपंच उषा वाळके, संदीप ढेरंगे व साईनाथ वाळके हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.