संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी ज्यु.कॉलेजच्या कुणाल भुजबळची महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड

कुणालने राखली संजीवनीची राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाची परंपरा कायम

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या कुणाल राहुल भुजबळ या खेळाडूची जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या १९ वर्षे वयोगटांतर्गत मुलांच्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. दरवर्षी एकतरी संजीवनीचा खेळाडू महाराष्ट्राच्या एकातरी संघात सहभागी असतो. या वर्षी कुणालने ही परंपरा राखली आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु.कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपुर यांच्या वतीने महाराष्ट्रातील आठ विभागामधुन आलेल्या ८० खेळाडूंमधुन राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघाच्या १६ खेळाडूंची निवड झाली. या निवड चाचणीमध्ये कुणालने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शण केले व त्याला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्याच्या निवडीचा जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळी असा प्रवास झाला.संजीवनी मध्ये प्रत्येक खेळाचे राष्ट्रीय पातळीवर ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या कोचेसची नेमणुक, भव्य मैदाने, खेळाचे संपुर्ण साहित्य आणि खेळाडूंना प्रोत्साहन या सर्व बाबींमुळे संजीवनीचे खेळाडू विविध पातळीवर संजीवनीचा क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करीत आहेत.कुणालच्या या यशाबद्धल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी कुणालचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य डॉ.आर.एस.शेंडगे उपस्थित होते. कुणालला कोच अक्षय येवले, शिवराज पाळणे व सत्यम केाठळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे