विजय वहाडणे

शांतता समितीच्या मिटिंग का होत नाहीत – विजय वहाडणे

0 5 4 4 3 3

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरात कायमस्वरूपी शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी नियमितपणे शहरात शांतता समितीची मिटिंग होणे अत्यंत गरजेचे असूनही मात्र तसे होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल जयंती,पुण्यतिथी,धार्मिक असे कार्यक्रम शांततेत व्हावेत यासाठी वेळोवेळी शहरातील सर्व पक्षीय-सर्व धार्मियांचे नेते-कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांचेसह मीटिंग न घेता
वेळोवेळी काही ठराविक जातीच्या किंवा धर्माच्या ठराविक नेते व कार्यकर्त्यांना बोलावून मिटिंगचा उपचार पार पाडला जातो.मात्र सर्व धर्मियांना एकत्रित बोलावून सर्वसमावेशक मीटिंग होत नसल्याने एकमेकांबद्दलचे समज- गैरसमज- म्हणणे-वाद मांडलेच जात नाहीत. त्यामुळे अनेक विषयावर असलेले वाद-संघर्ष आतल्या आत घुमसत रहातात व एखाद्या दिवशी,एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम-उत्सवात त्या असंतोषाचा स्पोट होतो हे कोपरगावकरांनी अनेकदा अनुभवले आहे.काही नेते स्वतःला फार मोठे विचारवंत किंवा मीच फार मोठा आहे असे समजून कुणाशीही विचारविनिमय-चर्चा न करता कोपरगाव बंदही पुकारतात मात्र हातावर पोट भरणाऱ्यांचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाल होतात.सर्वात जास्त नुकसान लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे- दुकानदारांचे होते. त्यामुळे
शहरात अनेक अपप्रवृत्ती बळावत चालली आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढून कायदा व शांतता तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे याच वातावरणाचा फायदा घेऊन अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्ते बाजी करणारेही समाजसेवक म्हणून सध्या मिरवताना दिसून येत आहे हे ही एक कटूसत्य आहे.तेव्हा पोलीस प्रशासनाने व तहसीलदारांनी पुढाकार घेऊन शांतता कमिटीच्या मिटिंगा वरचेवर घेतल्या पाहिजेत.

जाहिरात
जाहिरात

शहरातील स्वच्छ प्रतिमेचे समाजसेवक, कार्यकर्ते, व्यापारी प्रतिनिधी, राजकीय नेते-कार्यकर्ते, संघटना यांना बोलावून विचारविनिमय केला पाहिजे. अन्यथा आधीच शिगेला पोहचलेली गुन्हेगारी तसेच समाज कंटकांची मुजोरी अशाने तर वाढतच जाणार आहे.तेव्हा पोलीस प्रशासनाने आपला पोलीसी खाक्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच शहरातील तडीपार-अवैध धंदे करणाऱ्यांची सध्या पोलीस स्टेशनमधील उठबस सर्वसामान्य नागरिकांसाठी, शहरासाठी घातक आहे राजकीय हस्तक्षेपाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बळी पडू नये.दंडूक्याचा वापर करा हे मी अधिकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो. पण ते कोणाच्या दबावाखाली आहेत हेही कळत नाही. आता तर भर वस्तीत दरोडे पडू लागलेत. आता तरी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतलीच पाहिजे हिच अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 4 3 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे