आ.आशुतोष काळेंच्या हस्ते कोतवाल (महसूल सेवक) यांना नियुक्ती पत्रांचे वितरण

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महसूल सेवक अर्थात कोतवाल हा गावपातळीवरील प्रशासनाचा अविभाज्य भाग असून शासनाच्या विविध उपक्रम राबविण्यात महसूल सेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते.त्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून नागरीकांच्या समस्या सोडवा असे आ.आशुतोष काळे यांनी नवनियुक्त महसूल सेवकांच्या नियुक्ती पत्र वाटप प्रसंगी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील करंजी, कोकमठाण,चास नळी,मळेगाव थडी,माहेगाव देशमुख, येसगाव, रवंदे, संवत्सर आदी गावातील महसूल सेवकांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, नवीन कोतवालांनी (महसूल सेवकांनी) प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करताना पारदर्शकता, तत्परता आणि जवाबदारीने काम करणे आवश्यक आहे.

गावोगावी शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.आपल्या कामात प्रामाणिकपणा, तत्परता आणि सेवा वृत्ती ठेवावी. प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करतांना गावकऱ्यांच्या अडचणी दूर करून आपल्या जबाबदारीला पूर्ण न्याय दिला पाहिजे. हे काम केवळ सरकारी कर्तव्य नसून लोकसेवेचे एक मोठे माध्यम आहे. गावातील नागरिकांच्या अडचणी दूर करणे, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून वेळेत आणि योग्य पद्धतीने राबवणे,आपत्ती काळात मदत करणे तसेच शिस्तबद्ध व पारदर्शक सेवा देणे हीच खरी सेवा असल्याचे सांगितले.

आणि आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे सेवा देण्याचे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले व महसूल सेवकांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,मंडलाधिकारी मच्छिंद्र पोकळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.