गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा सुरु

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजन गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य फुटबॉल मैदानावर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिया शेख, शाळेचे प्राचार्य नूर शेख, शाळेचा क्रीडा विभाग, अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील फुटबॉल संघ व प्रशिक्षक, गौतम पब्लिक स्कूलचे फुटबॉल खेळाडू,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी उपस्थित सर्व खेळाडू व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, फक्त खेळाच्या मैदानावरच नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती खेळाद्वारे आपल्यात निर्माण होते.

शाळेच्या स्थापनेपासून आजतागायत शाळा सातत्यपूर्ण क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करत असून याचे श्रेय संस्था अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे यांचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आ.आशुतोष काळे स्वतः क्रीडाप्रेमी असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च प्रशिक्षित प्रशिक्षक तर आहेतच त्याचबरोबर सर्व सुविधांयुक्त भव्य क्रीडांगणे देखील आहे. या सर्व सुविधांचा विद्यार्थी फायदा घेत असून विविध मैदानी खेळात विशेषत: हॉकी, फुटबॉल मध्ये गौतम पब्लिक स्कूलचा दबदबा आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करून नवनवीन राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम गौतम पब्लिक स्कूल करीत असल्याचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी सांगितले. शाळेचे प्राचार्य नूर शेख यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगून खुरांगे यांनी प्राचार्य नूर शेख यांचे याप्रसंगी कौतुक केले.गौतम पब्लिक स्कूल मध्ये सर्व प्रकारच्या खेळास पोषक वातावरण असल्यामुळे सातत्याने विविध खेळांच्या विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा शाळेत आयोजित केल्या जातात.

यावर्षीही राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान गौतम पब्लिक स्कूल ला मिळाला असल्याची माहिती यावेळी प्राचार्य नूर शेख यांनी दिली. जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने बुधवार (दि.८) रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील असे दोन्ही फुटबॉल संघ अनुक्रमे अंतिम व उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद व सर्व हाऊस मास्टर्स मेहनत घेत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन एनसीसी एएनओ उत्तम सोनवणे यांनी केले तर आभार शिस्त विभाग प्रमुख रमेश पटारे यांनी मानले.