गांधीनगर भागात पहाटेच्या सुमारास कोयता बेसबॉल दांडा पाईपने एकास मारहाण चौघांवर गुन्हे दाखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय २३ वर्ष हा हनुमान मंदिराजवळून जात असतांना त्यास हर्षल रोकडे यांने गच्ची पकडून खाली पाडून शिवीगाळ करून दमदाटी केली तर त्याच्या हातातील बेसबॉलच्या दांडक्याने रुपेश याच्या हातापायावर मारहाण केली तर रोहित कुंढारे याने पाईपने तर गणेश रोकडे व वैभव कुऱ्हाडे यांनी उलट्या कोयत्याने रुपेश गायकवाड यांच्या हाता पायावर जबर मारहाण केली सदर ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून याबाबत आज शुक्रवारी दुपारी ०३.१० वाजता रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये ३३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चेक कलम ११८(१),११५(२),३५१,३५१(२),(३),(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक. एल.रोकडे हे करीत आहे.