Breaking
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन

आपेगाव येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी पूजा समाधान भातकुडव वय २९ ही महिला ३० जून २०२५ पासून घरातून निघून गेली होती तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही सदरची महिलाही गावातील सचिन खिल्लारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्याने तिला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यास आणले असता तिच्या वडिलांनी विरोध केल्याने या प्रकरणाणे वेगळे वळण धारण केले याबाबत मयत मुलीचे वडील नवनाथ बागुल राहणार सावखेड खंडाळा तालुका वैजापूर यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी दिली की सदर मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच दिवशी रात्री नऊ वाजता शोकाकुल वातावरणात आपेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अधिक ची माहिती अशी की पूजा भातकुडव हिचे माहेर सावखेडा खंडाळा तालुका वैजापूर येथील असून तिचे लग्न
आई-वडिलांनी मोठ्या डामाडौलात करून दिले होते त्यांचा संसार सुखाचा सुरू असताना त्यांना एक मुलगी दुर्गा (वय ६ वर्ष) व एक मुलगा शंभू (वय २ वर्ष) अशी दोन मुलं झाली मात्र ३० जून रोजी पूजा ही घरातून गायब झाली तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे तिच्या कुटुंबाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवल्या बाबत ४४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे तक्रार दाखल केली होती तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावातील शेतकरी सचिन खिलारी यांचे शेतातील विहिरीत मृत अवस्थेत पाण्यात तरंगत असतांना आढळून आली त्यांनी याबाबत आपेगाव पोलीस पाटील यांना व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांना सदर घटनेची माहिती कळवली सदरची माहिती कळताच तेथील नागरिकांनी पोलीस पाटील व पोलिसांच्या उपस्थितीत सदर महिलेला विहिरीतून वर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिच्या आई-वडिलांनी कोपरगाव येथे शवविच्छेदन करण्यास नकार दिला त्यानंतर सदरचे शव हे लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते याबाबत नवनाथ अंबादास बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास दादाभाऊ भातकुडव सुमन भानुदास भातकुडव व सागर भानुदास भातकुडव यांच्याविरुद्ध २०१/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०८,११५ (२) ३५२,३५१(२),(३),३,(५) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »