रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे अध्यक्षपदी डॉक्टर विनोद मालकर आणि सचिवपदी विक्रम लोढा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल कार्यकारिणी नुकतीच बिनविरोध पार पडली. यात अध्यक्षपदी डॉक्टर विनोद मालकर आणि सचिव पदी विक्रम लोढा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रांतपाल रविकिरण डाके उपस्थित होते.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ. मालकर म्हणाले की रोटरी चे कार्य हे सेवाभावी आणि समाज उपयुक्त आहे. येणाऱ्या नवीन पिढीला नेतृत्व कौशल्याचे गुण शिकविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रोटरी चे जगाला सर्वात मोठे योगदान म्हणजे पोलिओ निर्मूलन आहे .

याच धरतीवर प्रत्येक समाजासाठी काही ना काही योगदान देण्याचे आमचे प्रयत्न असणार आहे.संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संपूर्ण कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.रोटरी सदस्य रोहित वाघ, वीरेश अग्रवाल, अमर नरोडे, डॉ. रावसाहेब शेंडगे, प्रकाश जाधव, डॉ. महेंद्र गवळी, कपिल पवार, हर्षल दोषी, कुणाल आभाळे, इमरान सय्यद, विशाल मुंदडा, रिंकेश नरोडे, सनी आव्हाड,नवनाथ सोमासे, अनुप पटेल, अनूप डागा आणि इतर सन्माननीय सर्व सभासद उपस्थित होते.रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष राकेश काले यांनी सरत्या रोटरी वर्षाचा आढावा घेतला आणि मावळते सचिव विशाल आढाव यांनी आभार मानले.