गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांचे पथसंचलन संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोपरगाव पोलीस स्टेशन येथून गजानननगर गोरोबा मंदिर रोड दत्तनगर इंदिरानगर हनुमाननगर मावळा चौफुली रोडने राम मंदिर रोड पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकातून धारंणगाव रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बस स्थानक परिसर येथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळून पुढे महात्मा गांधी पुतळा रोडने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली.गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंंचलन केले यावेळी पोलिसांसह होमगार्ड पथक तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार

पोलीस उपनिरीक्षक डी के रोटे पोलीस उपनिरीक्षक एस एस सोन्ने महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्यासह पुरुष व महिला अंमलदार पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान यांनी पथसंचलन केले गणेश उत्सव आणि मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद हा पवित्र सण या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे तसेच संवेदनशील भागामध्ये सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे तेव्हा नागरिकांनी धार्मिक सलोखा कायम राखत दोन्हीही उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.