कोपरगाव शहर पोलिसांनी विना नंबर प्लेट व विना लायसन्स ५१ केसेस करून केला ३१ हजार रुपयांचा दंड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरात विघ्नेश्वर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ विना नंबर प्लेट तसेच मॉडीफाय सायलेन्सर तसेच विना नंबर प्लेट व विना लायसन्स तसेच ट्रिपल सीट अशा वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत बुधवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी कारवाई करण्यात आली सदरची कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या सह गृह रक्षक दलाच्या जवानांनी सदरची मोहीम राबवली कोपरगाव शहरांमध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेन्संर बदलून विना परवानगी कर्णकर्कश्य आवाज येणारे तसेच फटाके फोडणारे सायलेन्संर गाड्यांना लावल्यामुळे त्याचा परिणाम वयोवृद्ध नागरिकांना लहान मुलांना व महिलांना या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता

त्याचप्रमाणे विना नंबर प्लेट गाड्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट त्याच प्रमाणे विना नंबर प्लेट गाड्या विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते त्या अनुषंगाने शहरात अचानक ही कारवाई करण्यात आली यामध्ये ५१ वाहनांवर कार्यवाही करण्यात येऊन त्या मोटार सायकल वर मोटार वाहन कायद्याखाली ३१,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करून त्या गाड्या सोडण्यात आले आहे यापुढे देखील शहरात सातत्याने अशी कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वच वाहन चालकांनी दोन्ही नंबर प्लेट सुस्थितीत असल्याची खात्री करावी त्याचप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर कोणी वापरत असेल तर ते तात्काळ बदलून घ्यावे असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी वाहन चालकांना केले आहे.