कोपरगावात नायलॉन मांजा जप्त

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमाविरूद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून आठ हजार रूपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.कोपरगाव शहराच्या गावठाण भागातील जुन्या मामलेदार कचेरी जवळ राहणारा मतीन जब्बार मनियार हा आपल्या घरातून नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घराची झडती घेतली तेव्हा नायलॉन मांजाच्या आठ रिळ आढळल्या. या मांजाच्या किंमत आठ हजार रूपये इतकी आहे. पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून मतीन मनियार विरूद्ध भारतीय न्य संहिता २२३, १२५ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. बी.एच. तमनर हे करीत आहेत.