इंस्टाग्रामवरील शिवीगाळाचे रूपांतर पुढे मृत्यू मध्ये झाले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शनिवार दिनांक १० मे २०२५ रोजी इंस्टाग्राम वरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून ५ जणांनी मिळून साईनाथ गोरक्षनाथ काकड वय २४ राहणार डोऱ्हाळे तालुका राहाता, जिल्हा आहिल्यानगर यास मारहाण करून काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत साईनाथ गोरक्षनाथ काकड हे शिक्षणानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते तेव्हा रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघे पुणे येथेच वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते यातील मयत साईनाथ काकड याने रूपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्राम वरून आक्षेपार्य मेसेज करून शिवीगाळ केली म्हणून या गुन्ह्यातील आरोपी रूपाली संजय लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसणे पवन कैलास आसणे व राहुल अशोक चांदर हे सर्वजण मयत साईनाथ काकड जिथे राहत होता तेथे जाऊन त्याला घरातून बाहेर ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आणून मारहाण करून त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे

याबाबत मयताचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकड वय -२६ राहणार डोऱ्हाळे हल्ली मुक्काम अंबड नाशिक यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून- २५१/२०२५ कलम १०३(१),१४०(१)१८९(२)१९१(२) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे दिनांक १० मे २०२५ रोजी रात्री २१ वाजून ५८ मिनिटांनी सदरचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून सदर घटनास्थळाला शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट दिली असून या गुहयातील ३ आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक महिला फरार झाली असून तिचा शोध घेणे कामी पोलीस कर्मचारी रवाना केले आहे सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहेत.