जल संधारणाची कामे सूरु करावीत-ॲड नितीन पोळ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुका हा कधी काळी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच कोपरगाव तालुक्याची वाटचाल आता राजकिय नेत्यांच्या अनास्थे मूळे दुष्काळाच्या दिशेने वेगाने सूरू झाला आहे मागील साधारण पंचवीस वर्षां पासुन समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या छाताडावर थयथयाट करत आहे. त्याचे दुष्परिणाम तालुक्यांतील शेतकरी भोगत आहे. सदर कायदा अन्याय कारक आहे म्हणून या कायद्याचा पुनर्विचार करावा यासाठी न्यायालयीन लढा उभारून फेर अहवाल सादर करण्याचे ठरले त्या दृष्टीने मांदाडे समिती स्थापन करण्यात आली मात्र त्यातून देखील खूप काही हातात पडेल याची शक्यता दिसत नाही.मागील पंचवीस वर्षात तालुक्यांत जल संधारणाचे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले असते तर काही अंशी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता.

मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागात मोठया प्रमाणावर जल संधारणाची कामे मार्गी लागली त्यातून अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध झाले या उलट वाढती लोक संख्या औद्योगिकीकरण,मराठवाड्या ने पाण्यावर सांगितलेला हक्क त्यातून आपल्या भागातील शेती व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र यासाठी मोठया प्रमाणावर जल संधारणाचा कार्यक्रम हाती घेऊन नाले,ओढे यांचे नूतनीकरण खोली दुरुस्ती रस्त्याच्या साईड गटार दुरुस्ती इत्यादी कामे केली तर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल तसेच अति वृष्ठी मूळे शेती व पिकाचे होणारे नुकसान टाळता येईल.सदरची कामे एप्रिल मे मध्ये होणे अपेक्षित आहे मात्र सद्या अर्धा मे महिना उलटून गेला मात्र अजुन तरी तालुक्यांत कूठे जल संधारण योजनेची कामे सूरू नाहीत या तीन महिन्यात जल संधारणाच्या कामावर भर दिला असता तर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास मदत होईल.