लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून लढाऊ बाणा असलेली स्त्री रेखाटली- ॲड.नितीन पोळ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शेतकरी, कष्टकरी,मजूर कामगार यांच्या बरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून लढावू बाणा असलेली स्त्री रेखाटली असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.नितीन पोळ यांनी केले
अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य साधून व डिजे ढोल न वाजवता एक अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करून समाजासमोर एक आदर्श मूर्तिमंत असा आदर्श दिला कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील ताराबाई पवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गोदावरी नदीच्या पात्रात वाहून जात असतांना तांगतोडे कुटुंबातील दोन भावांना जीवदान दिले त्या निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य कृतीतून शेतकरी, कष्टकरी शेत मजूर हमाल यांच्या बरोबरच लढावू बाणा असलेली स्त्री रेखाटली असुन त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला
तर आबी, आवडी, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, नवती, तारा,मथुरा, रत्ना या सर्वच कादंबऱ्या मधून परिस्थितीशी संघर्ष करणारी व लढावू स्री चित्रित केली आहे आज अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ताराबाई पवार यांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले असुन त्यांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल असेही पोळ म्हणाले या वेळी भूमिपुत्र फाऊंडेशनचे निसार भाई शेख, एकलव्य आदिवासी संघटनेचे उत्तम पवार यांनी पवार कुटुंबीयांना शासकीय योजनांतून घरकुल व कुटुंबीयांना अर्थिक मदत मिळावी या साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या वेळी प्रकाश शिंदे किसन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.