कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.उपनिरिक्षक वांढेकर व गागरे यांची उपनिरीक्षक पदी पदोन्नतीने बदली

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन सूर्यभान वांढेकर यांची कोकण-२ विभाग (म सु प) येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सुरेश सबाजी गागरे यांची देखील कोकण-२ (कोकण परिक्षेत्र) येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णय सा. प्र.विभाग. क्र. एस आर व्ही २०१८/ प्र.क्र. १५९ कार्यासन-१२ दिनांक ०१/०८/२०१९ च्या आदेशानुसार विभागीय अहर्ता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व पोलीस उपनिरीक्षक गट ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नती देण्याबाबतच्या सन २०२३-२४ च्या निवड सूची वरील पात्र अंमलदारांना स्थानापन्न २५ % कोट्यातील रिक्त पदात पदोन्नती देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार त्यांची पदोन्नती होऊन कोकण विभागात बदली झाली आहे.