चासनळी मधून 1 लाख 31 हजार रुपयांची देशी दारू चोरीला

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावांतून रविवार दिनांक 2 मार्च 2025 च्या रात्री 10 वाजे नंतर ते सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजीच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान देशी दारूच्या दुकानाचे कुलुप तोडून शटर उघडून आत प्रवेश करून आत मध्ये ठेवलेल्या 180 मिलीचे प्रिन्स संत्रा कंपनीचे देशी दारूचे 33 बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये 48 बॉटल असलेले व सध्याच्या बाजार भावानुसार त्याची किंमत 1 लाख 10 हजार 880 रुपये तसेच 90 मिलीचे प्रिन्स संत्रा कंपनीचे देशी दारूचे 6 बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये 100 बॉटल त्याची बाजार भावा नुसार किंमत 21 हजार रुपये एकूण 1 लाख 31 हजार 880 रुपये किंमतीची देशी दारू अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्या करिता चोरून नेली आहे याबाबत परसराम नारायण सुद्दाला रा.कोळपेवाडी यांच्या फिर्यादी वरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये 56/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(4),305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे हे करीत आहेत.