सुरेगांव येथील किराणा दुकान फोडुन सामानाची चोरी करणारा आरोपी ४८ तासात अटक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनला मध्ये दाखल फिर्यादी विलास मनोहर वाबळे वय-५० वर्ष यांचे किराना दुकाण फोडून दुकानातील माल चोरीला गेल्याची फिर्याद दिनांक ०७ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१,(१),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी प्रमाणे दिनांक ०५ ऑगस्ट रोजी रात्री ९.०० ते दिनांक ०६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४५ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मालकीचे मातोश्री किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स सुरेगाव ता. कोपरगाव या दुकाणाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशानेतरी उचकटुन आत प्रवेश करुन दुकाणातून रक्कम रुपये ५४४५५/- रु कि चा किराणा सामानाचा मुद्देमाल ज्यामध्ये किराना वस्तु व रोख रक्कम, घरफोडी चोरी करुन चोरून नेले आहे अशा फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मुददेमालाचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार असलेला कपिल राजु पिंपळे वय २७ वर्षे धंदा मजुरी रा. मोतीनगर कोळपेवाडी ता. कोपरगांव जि. अहिल्यानगर. याने त्याचा अल्पवयीन साथीदार याचे सोबत मिळून केलेला आहे. अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ स.पो.नि धरमसिंग सुंदरडे महिला पो.उप.नि. वैशाली मुकणे, पोलीस अंमलदार दहीफळे, गुंजाळ, वाघ यांच्यासह कपिल राजु पिंपळे यांच्या सह त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो घरी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा हा केलेला असल्याचे माण्य केले. पालीसांनी पंचांचे समक्ष त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी खालील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल व त्याचा मोबबाईल फोन मिळून आल्याने पोलीसांनी सदरचा मुददेमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये १) २१६०/- रुपये किंमतीच्या मुरली कंपनीचे सोयाबीन रीफाईन ऑईलच्या एकुण तीन कॅन. प्रत्येकि पाच लिटर क्षमतेच्या त्यावर प्रत्येकि ७२० रुपये रु. छापील किंमत असलेल्या २) ६८८/- रुपये किंमतीचे कोथबिर धना पावडर चे एकुण ८ सीलबंद पाकिटे. प्रत्येकि २० ग्रॅम वजनाचे व त्यावर ८६/- रुपये प्रत्येकि किमत असलेले ३) ६००/- रुपये किंमतीचे महादेव प्युअर सेलम हल्दी पावडरचे ३ सीलबंद पाकिटे प्रत्येकि ५०० ग्रॅम वजनाचे व २०० रुपये प्रत्येकि किंमत असलेले.

४) १४००/- रुपये किमतीचे महादेव प्युअर सेलम हल्दी पावडरचे १४ सीलबंद पाकिटे. प्रत्येकि २०० ग्रॅम वजनाचे व १०० रुपये प्रत्येकि किंमत असलेले.५) ४००/- रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे प्रत्येकि १०० ग्रॅम वजनाचे ८ सलिबंद पाकिटे, त्यावर प्रत्येकि ५० रुपये छापील किंमत असलेले.६) १८९०/- रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे पिवळया रंगाचे एकुण १८९ सिलबंद छोटे पाकिटे, त्यावर प्रत्येकि १० रुपये छापील किंमत असलेले.७) १३० /- रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे हिरव्या रंगाचे एकूण २६ सिलबंद छोटे पाकिटे. त्यावर प्रत्येकि ५ रुपये छापील किंमत असलेले व १५ ग्रॅम प्रत्येकि वजन असलेले,८) ८०/- रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे हिरव्या रंगाचे एकुण २ सिलबंद पाकिटे. त्यावर प्रत्येकि ४० रुपये छापील किंमत असलेले व १०० ग्रॅम प्रत्येकि वजन असलेले.९) ८०/- रुपये किंमतीचे जयानंद एम.डी. कंपनीचे २ सिलबंद पाकिटे, प्रत्येकि १०० ग्रॅम वजनाचे व त्यावर ४० रुपये छापील किंमत असलेले.१०) १०,०००/- रुपये किंमतीचा एक VIVO Y400 PRO 5G कंपनीचा पर्पल रंगाचा मल्टीमिडीया मोबाईल फोन. त्याचा IMEI क्रमांक 1) 8633970789696942) 863397078969686 असा असलेला जुवाकिअ.येणे प्रमाणे आरोपीताचे ताब्यातुन रक्कम रुपये १७,४२८/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयात पोलीसांनी सराईत गुन्हेगार आरोपी कपिल राजु पिंपळे वय २७ वर्षे यास दिनांक ०८ ऑगस्ट रोजी अटक केलेली असुन त्यास दिनांक ९ ऑगस्ट रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कोरगांव यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस ११ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.सदरची कार्यवाही ही सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,शिरिष वमने, उपविभागीय पोलीस अधीकारी शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी, सपोनि धरमसिंग व्ही. सुंदरडे, महिला पो.उप.नि. वैशाली मुकने पो.हे.कॉ दहीफळे, पो.कॉ वाघ, पो कॉ.गुंजाळ, पो.कॉ सुकटे, पो.कॉ.सानप यांचे पथकाने केली आहे.