स्थानिक बाजारपेठेतुन स्नेहलताताई कोल्हेंनी खरेदी केल्या राख्या

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कार्यकर्त्यांना राख्या बांधुन दिला एकतेचा संदेश बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सर्वच क्षेत्रात नव नविन आव्हाने निर्माण होत आहे. ऑनलाईनच्या जमान्यात स्थानिक व्यापा-यापुढे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांवच्या बाजारपेठेतुन राख्यांची खरेदी करत त्या कार्यकर्त्यांना बांधल्या त्यातुन त्यांनी एकतेचा संदेश दिला आहे.

रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याचा सण त्याचा आनंद स्थानिक पातळीवर अधिक द्विगुणित करण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट कोपरगांवच्या बाजारातुन स्थानिक व्यापा-यांकडुन राख्या खरेदी करत कार्यकर्त्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून अनोखा संदेश दिला आहे.प्रत्येक सणासुदीस लागणा-या साहित्याची खरेदी कोल्हे परिवार नेहमीच स्थानिक व्यापा-याकडुन करत असतात, व इतरांनाही त्याबाबतची प्रेरणा दिली जाते. कोरोना महामारीनंतर आणि ऑनलाईनच्या जमान्यात प्रत्येक व्यावसायिकांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहे त्यावर कशी मात करायची या चिंतेत हे व्यापारी बांधव असतात तेंव्हा प्रत्येकांने स्थानिक खरेदीला प्राधान्य द्यावे असे सांगुन त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सर्व मंत्रीमंडळाने लाडकी बहिण योजनेतुन कायमस्वरूपी रक्षाबंधनाची मोठी आठवण दिलेली आहे.
लाडक्या बहिणींना या योजनेचा मोठा आधार ठरत आहे. याशिवाय गोर गरीब घटकांसाठी विविध दर्जात्मक स्तरावरील योजनांची आखणी करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर महायुती शासनाचा भर आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे पण काही ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले तेंव्हा मतदार संघातील प्रत्येक भावांनी पुढाकार घेत त्यांच्या अडचणी दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून रक्षाबंधनाची अनोखी भेट द्यावी.