अमरनाथ गवसणे यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नतीने नियुक्ती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्य पोलीस उपनिरीक्षक (सहाय्यक फौजदार) अमरनाथ वैजिनाथ गवसणे यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी (ग्रेड पीएसआय) पदोन्नती देण्यात आली आहे याबाबतचे आदेश अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतेच काढले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस दलामध्ये एकूण ३० वर्ष सेवा पूर्ण केलेले तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर किमान ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदाची वेतन घेत असलेल्या सहाय्य पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात येते त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले अमरनाथ गवसणे यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले अमरनाथ गवसणे यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधण्यात येऊन त्याबाबत स्टेशन डायरीमध्ये नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल उलट टपाली कार्यालयास सादर करावा याबाबतचे आदेश २६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या स्वाक्षरीने सदरचे आदेश काढले आहेत.