कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन

एटीएम मधे लोकांची फसवणुक करुन पैसे काढणारा महाठक अखेर जेलबंद

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

राहाता शहरात दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05.45 वाजेच्या सुमारास चंद्रभान लक्ष्मण वाणी वय 63 वर्षे धंदा-सेवा निवृत्त रा.नांदुर्खी खुर्द ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर हे पैसे काढण्यासाठी राहाता शहरातील मैड हॉस्पीटल समोरील स्टेट बँकेचे ए.टि.एम मध्ये गेले असता तेथील अनोळखी दोन इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करुन माझेकडील एक.टि.एम कार्ड घेवुन हात चलाखी करुन त्यांचे कडील दुसरे स्टेट बँकेचे ए.टि.एम कार्ड हे ए.टि.एम मशीन मध्ये टाकुन चंद्रभान वाणी यांना एक.टि.एम चा पीन टाकण्यास सांगुन त्यांचा एक.टि.एम चा पीन पाहुन घेवुन त्यांचे कडील दुसरे एक.टि.एम कार्ड त्यांना देवून ते बाहेर गेल्यावर त्यांचे ए.टि.एम कार्ड हे मशीन मध्ये टाकुन त्यांच्या खात्यातील 22,000 रुपये काढुन घेवुन फसवणुक केल्याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि क्रमांक 43/2025 भा.न्या. संहिता कलम 318 (4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, स.फौ.प्रभाकर शिरसाठ, पो.हेड.काँ.अशोक झिने, पो.हेड.कों. श्रीकांत नरोडे होमगार्ड शेलार असे तपास करत असतांना दिनांक 02/03/2025 रोजी सायकांळी 06/00 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहीती मिळाल्याने तेथे वरील स्टाफ गेला असता, तेथील सदर व्यक्तीच्या नावाची खात्री केली असता त्याचे नाव दिपक राजेद्र सोनी वय 35 वर्षे रा. 148 वार्ड नं. 11, गोवर्धन टाकी जवळ, सरणीमार्ग, छतरपुर मध्यप्रदेश हल्ली राहणार .301, संगमनगर बागसवेनिया भोपाळ राज्य मध्यप्रदेश असे असल्याचे समजले. सदर इसम प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने तसेच संशयीतरित्या हालचाली लक्षात आल्याने दोन पंचासमक्ष पोलीसांनी त्याची झडती घेतली असता सदर आरोपींच्या अंगझडतीत एकुण 69 ए.टी.एम कार्ड वेगवेगळ्या बँकेंचे मिळून आले आहेत. तसेच दोन चिकटविण्यासाठी लागणारे फेवीक्वीक मिळुन आले असुन त्याने एटीएमची अफरातफर करुन फसवणुक करुन पैसे काढत असल्याचे कबुल केले आहे तसेच सदर आरोपीने वरील गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यास दिनांक 02 मार्च 2025 रोजी अटक करून त्याला मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक 07 मार्च 2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली असुन सदर घटनेचा पुढील तपास सुरु आहे. सदर 69 एटीएम हे वेगवेगळ्या शहरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबमें तसेच शिडी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचने प्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकासह सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे