भाऊसाहेब उगले यांचे दुःखद निधन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव तालुक्यातील मळेगांवथडी येथिल रहिवासी भाऊसाहेब सखाहरी उगले (वय ५९) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते कोपरगांव पंचायत समितीचे माजी सभापती, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व स्व. शंकरराव कोल्हे यांचे खंदे समर्थक सखाहरी सावळेराम उगले यांचे चिरंजीव होत. कै. भाऊसाहेब उगले हे अतिशय मितभाषी व मनमिळाउ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, बंधु सुर्यभान उगले व रमेश उगले असा परीवार आहे.

त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मित्र परीवारात हळहळ व्यक्त होत आहे .भाऊसाहेब उगले यांच्या निधनाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांनी शोक व्यक्त केला आहे.