कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे स्थानिक गुन्हे विभागाची मोठी कारवाई

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 3 लाख 90 हजार 606 रुपयांचा सुगंधित पान मसाला व गुटखा व त्यामध्ये वापरण्यात आलेली टाटा कंपनीची एसीई झीप कंपनीची निळ्या रंगाची मालवाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच 15 ईजी 1973 ही गाडी जप्त करण्यात आली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर छापा टाकला असता त्या ठिकाणी रॉयल 717 तंबाखूचे 86 पुडे मिळून आले त्याची बाजारभावानुसार किंमत 2580 रुपये तर विमल पान मसाला गुटख्याचे 55 पुडे त्याची बाजारभावानुसार किंमत 10 हजार 890 रुपये तर विमल पान मसाला बिगचे 37 पुडे त्याची बाजारभावानुसार किंमत 17,390 रुपये तसेच v1 बिग तंबाखूचे 36 लाल पुढे त्याची बाजारभावानुसार किंमत 180 रुपये तसेच v1 तंबाखू असे नाव लिहिलेले जांभळ्या रंगाचे 58 पुडे त्याची बाजार भावानुसार किंमत 1276 रुपये तसेच हिरा पान मसाला गुटख्याचे 86 पुडे त्याची बाजारभावानुसार किंमत 10 हजार 320 रुपये तसेच प्रीमियम राज निवास पानमसाला याची 59 पुडे त्याची बाजारभावानुसार किंमत 11,328 रुपये तसेच प्रीमियम झेड वन जाफराणी जर्दाचे 54 पुडे त्याची बाजार भावानुसार किंमत 2592 रुपये तसेच गोवा 1000 पान मसाला याची 21 पुडे त्याची बाजारभावानुसार किंमत 2520 रुपये तसेच जी-वन जर्दा तंबाखूचे 21 पुडे त्यांची बाजारभावानुसार किंमत 630 रुपये तसेच विवो कंपनीचे-2 रियल मी-1 कंपनीचे असे एकूण 3 मोबाईल त्यांची बाजारभाव नुसार किंमत 30 हजार रुपये व निळ्या रंगाची टाटा कंपनीची चार चाकी मालवाहतूक टेम्पो क्रमांक एम एच 15 इजी 1973 या गाडीची बाजारभावानुसार 3 लाख 90 हजार 606 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून याबाबत स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश हिरामण ढोले श्याम हिरामण ढोले दोघे राहणार माणकेश्वरनगर चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तसेच तिसरा आरोपी अजमल शेख राहणार दूध बाजार नाशिक हा फरार झाला असून या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये 52 ऑब्लिक 2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223,274,275,3(5) व अन्नसुरक्षा मानके आणि 2006 व नियमन 2011 चे कलम 26 (2) (प),26 (2) (प अ),27(3) (डी),27(3) (ई),59(प) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपींना कोपरगाव येथील माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत.