ब्राह्मणगाव शिवारात चोरट्यांचा 2 लाखावर डल्ला सोन्यासह रोकड लंपास

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात किरण अशोक कुऱ्हाडे यांच्या घरातून 1 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिऱ्यांसह 60 हजार रुपयाची रोकड अशी 2 लाख रुपयांची चोरी झाली आहे याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार 06 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10.30 वाजेनंतर ते 07 सप्टेबंर 2024 रोजीच्या सकाळ दरम्यान सदरची घटना घडली असून याबाबत किरण कुऱ्हाडे हे आपल्या कुटुंबासह झोपी गेले असता रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून घरामध्ये प्रवेश करून घरातील 1 लाख 40 हजार रुपयांची सोन्याचे दागिने या दागिन्यांमध्ये सोन्याच्या पळ्या सोन्याची पोत सोन्याची कानातील वेल सोन्याची लहान मोठे मणी असे एकूण 4.5 तोळे वजनाचे दागिने चोरीस गेले आहे त्याचबरोबर घरामध्ये ठेवलेले 60 हजार रुपये यामध्ये 500 रुपये व 100 रुपयांच्या नोटा असे एकूण दोन लाखांचा ऐवज लंपास झाला असून याबाबत किरण अशोक कुऱ्हाडे यांनी सदर घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली असता त्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 309/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 305 (अ) 331(4 ) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम शेख यांनी भेट दिली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत आहेत.