अखेर मुहूर्त ठरला, कोपरगावकरांसाठी रविवार ठरणार ‘सुवर्ण दिवस’ ५ नं.साठवण तलावाचे होणार जलपूजन आ.आशुतोष काळेंची गुड न्यूज

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कधी होणार, कधी होणार याची संपूर्ण कोपरगावकरांना लागलेली ओढ संपुष्टात आली असून रविवार १५ सप्टेंबर कोपरगावकरांसाठी ‘सुवर्ण दिवस’ ठरणार असून दुपारी ३.०० वाजता ५ नंबर साठवण तलावाचे जलपूजन करण्यात येणार असल्याची गुड न्यूज आ.आशुतोष काळे यांनी सोमवार दि.०९ सप्टेबंर २०२४ रोजी पत्रकात परिषदेत दिली आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेवून कोपरगावकरांची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दलची माहिती देवून कोपरगावकरांना या जलपूजन कार्यक्रमाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. यावेळी पत्रकात परिषदेत बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, बहुचर्चित असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यापासून काम पूर्णत्वाकडे जाई पर्यंतचा इतिहास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी पत्रकात परिषदेत मांडला.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नऊ दिवस धरणे आंदोलन केले. त्यावेळी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचे जागेवर असणारे दगडमाती समृद्धी महामार्गासाठी वापरले जावे अशी मागणी केली मात्र त्यावेळी काय राजकारण झाले हे कोपरगावकरांना माहिती आहे. मात्र निवडून आल्यावर दोनच महिन्यात दगडमाती उचलण्याच्या कामाला प्रारंभ केला.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे ५ नंबर साठवण तलावासाठीचे जवळपास सात ते आठ कोटी रुपये वाचले. त्यानंतर साठवण तलावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले परंतु त्यासाठी वाढीव पाणी आरक्षित करणे गरजेचे होते.वाढीव पाणी प्रस्ताव दाखल केल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेची पाणी पट्टी थकीत असल्याचे दिसून आले.त्यामुळे पाणी पट्टी थकीत असतांना वाढीव पाणी आरक्षित होणे शक्य नव्हते.त्यावेळी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून थकीत पाणी पट्टीची रक्कम हफ्त्या-हफ्त्याने घेण्यास सांगितले व कोपरगाव नगरपरिषदेने देखील थकीत पाणी पट्टीच्या ह्फ्त्याची रक्कम भरली. त्यानंतर वाढीव पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळविली.ज्यावेळी वाढीव पाणी आरक्षित झाले त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली.
५ नंबर साठवण तलावाचे काम होवू नये यासाठी सात ते आठ वेळेस वेगेवगळ्या नावाने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले. त्याबाबत आजपर्यंत २२ तारखा झाल्या आहेत. काम थांबले जावे यासाठी पाच ते सहा ज्येष्ठ विधी तज्ञांची फौज यासाठी लावण्यात आली असून आजही तारखा सुरु आहेत. अजूनही हे काम कसे थांबविता येईल यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरु आहेत.-आ.आशुतोष काळे
त्यांनंतर शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली १३१.२४ कोटीच्या कामाचे टेंडर देखील निघाले व कामही सुरु झाले मात्र त्यानंतर काही दिवसांनी राज्यातील सरकार बदलले परंतु कामाचे टेंडर सर्वकाही नियमानुसार असल्यामुळे अडचणी आल्या नाही.१३१.२४ कोटीच्या निधीपैकी ८५ टक्केच रक्कम राज्य शासनाकडून मिळणार होती व उर्वरित १५ टक्के रक्कम हि कोपरगाव नगरपरिषदेला त्यांचा हिस्सा म्हणून भरावी लागणार होती. पहिल्या टप्प्याचा निधी आल्यानंतर हि रक्कम भरावी लागली नाही मात्र दुसऱ्या टप्याचा निधी येण्यापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेला त्यांच्या हिश्याची हि १५ टक्के रक्कम कोपरगाव नगरपरिषदेला भरणे क्रमप्राप्त होते.परंतु कोपरगाव नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता कोपरगाव नगरपरिषदेला दहा वर्षाचा कालावधी लागला असता.त्यामुळे हि देखील अडचण दूर करून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून हि १५ टक्केची जवळपास २० कोटीची रक्कम राज्य शासनाकडून माफ करून घेतल्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचे कामाला गती येवून हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागरिकांना उशिराने मिळणारे पाण्याचे दिवस कमी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान कोपरगाव शहरात गल्ली बोळात गेलो असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी साठवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाक्या पाहून कुणी आजारी पडले तर त्याठिकाणी चारचाकी वाहन देखील पोहोचू शकत नव्हते अशी परिस्थिती होत मात्र छोट्याशा जागेत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्याशिवाय दुसरा पर्याय पण नव्हता हि परिस्थिती मी स्वत: पाहिली असल्यामुळे हि परिस्थिती मला बदलावी वाटली व मला समाधान आहे की, हि परिस्थिती आता बदलणार आहे. माता भगिनींच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असून माता भगिनींनी या ‘जल पूजन’ सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी या पत्रकार परिषदेत केले.