दहा वर्षीय मुलास पळविण्याचा प्रयत्न अयशस्वी दोघांना केले जेरबंद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव शिवारात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घोयेगाव उक्कडगाव रस्त्याने पुष्पराज निकम हा दहा वर्षीय मुलगा शाळेतून घरी परतत असतांना अशोक बाबुराव शिंदे यांच्या वस्ती समोर दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हिरो होंडा एम एच १७ ए.के ७९३ वरून जात असतांना त्यांनी सदर मुला जवळ जाऊन म्हणाले की “बेटा इधर आओ आप हमारे साथ गाडी पर बैठो तुझे स्कूल छोडते है” असे म्हणून सदर मुलास पळून नेण्याचा प्रयत्न केला असता मुलाने जोरजोराने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धावत येऊन त्यांनी या दोघां इसमानां धरले सदर इसम हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कठोराबाजार येथील रहिवासी असून सदर व्यक्तींची नावे अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण असे असून त्यांना कोपरगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत उत्तम विष्णू निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादी वरून कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६ /२०२४ भारतीय दंड संहिता सन-२०२३ चे कलम १३७ (२),६२ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी भेट दिली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस.हेड कॉन्स्टेबल एन.एस शेख हे करीत आहे.