पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील फडके कॉलनी येथील ३९ वर्षीय युवकाने पत्र्याच्या शेडमधे असलेल्या वरील ॲंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धांरणगाव शिवारात आज शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजि. नं. ३९/२०२४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे नितीन शांताराम वाणी असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत भागचंद पोपट वाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा चुलत भाऊ नितीन शांताराम वाणी यांनी किरण शंकरराव दंडगव्हाण यांची धांरणगाव शिवारातील शेती वाट्याणे करत होता त्यामुळे तो तिथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत असे सदर नितीन वाणी याने पत्र्याच्या खोलीच्या वरच्या ॲंगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसून आल्याने त्यावरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, पो.कॉ.रशीद शेख पो.कॉ.रमेश झडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून त्यानंतर अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.