कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांची बदली

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील तहसीलदार संदीप कुमार भोसले यांची श्री साईबाबा संस्थान विश्वव्यवस्था शिर्डी येथील रिक्त असलेल्या प्रशासकीय अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २६ जुलै २०२४ रोजी शासन आदेश क्रमांक प्रतिनि-२०२४/प्र. क्र.१०३ अ/ई-३ या आदेशाप्रमाणे तहसीलदार संदीप कुमार भोसले हे कार्यरत असलेल्या कोपरगाव येथे तहसीलदार या पदावर अन्य अधिकारी याची पदस्थापना होऊन ते रुजू झाल्यानंतर संदीप कुमार भोसले तहसीलदार यांना सदर पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे व संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत ई-मेल द्वारे शासनास त्वरित कळवावे असे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे. तेव्हा आता कोपरगावला कोण नवीन तहसीलदार येणार याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.