Breaking
संजीवनी उद्योग समूह

संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज मानाच्या दहीहंडीची कमिटी जाहीर

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी संजीवनी युवा प्रतिष्ठानची सर्वात मनाची समजली जाणारी छत्रपती श्री शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्साहात साजरी होणार असून त्यासाठी कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असून सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव घट्ट करत आहे. गंगा गोदावरी महाआरती ढोल ताशा स्पर्धा विविध सांस्कृतिक स्पर्धा असे उपक्रम सुरू आहेत.यावर्षी होणाऱ्या दहीहंडीचे मोठ्या दिमाखात नियोजन सुरू आहे.कोपरगाव तालुक्यात सर्वप्रथम दहीहंडी सुरू करण्याची परंपरा विवेकभैय्या कोल्हे यांनी केली असून छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी म्हणून पाहिले जाते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अधिक जोरदारपणे हा उत्सव साजरा करावा यासाठी नवनियुक्त कमिटीला शुभेच्छा दिल्या आहे.या दहीहंडीसाठी विविध मानाचे पथक हंडी फोडण्यासाठी उपस्थित राहत असतात.

जाहिरात

यावर्षी देखील ही मानाची दहीहंडी याकडे सर्व कोपरगावकरांचे लक्ष असणार आहे.
अध्यक्ष–योगेश उशीर,        उपाध्यक्ष–सोमनाथ रोठे ,कार्याध्यक्ष–मयूर रिळ
सचिव–अनिल गायकवाड,खजिनदार–शुभम सोनवणे सदस्य म्हणून सागर गंगुले, ओम बागुल, राहुल आघाडे,राहुल रीळ,चेतन आव्हाड, विक्रांत किरण खर्डे आदींची कमिटीत निवड झाली आहे.डी. आर. काले,सिद्धार्थ साठे,गोपी गायकवाड, जगदीश मोरे, जयप्रकाश नारायण आव्हाड, प्रसाद आढाव, जनार्दन कदम, दीपक जपे, हाजी फकीर मोहम्मद पहिलवान, सुजल चंदनशिव, अर्जुन मरसाळे, शुभम सोनवणे, ओम बागुल, विक्रांत खर्डे, संदीप कुहिले, रवींद्र लचुरे, अशोक नायककुडे, राहुल आघाडे, गणेश शेजुळ, कैलास सोमासे, विनोद नाईकवाडे, शैलेश नागरे, प्रतीक रोहमारे, सौरभ सांगळे, योगेश उशीर, सोमनाथ रोठे, सचिन रोकडे, रोहित गुंजाळ, विक्रांत सोनवणे, राहुल रीळ,रोहित शिंदे, मयूर रीळ, सचिन अहिरे, सलमान कुरेशी, गोरख देवडे, युनूस शेख, फिरोज पठाण आदींसह युवक या निवडीवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »