श्रीरामपूर

श्रीरामपूर येथे नवोदित संपादकांसाठी समता कार्यालयात रविवारी मिटींगचे आयोजन

0 5 3 5 4 5

श्रीरामपूर शौकतभाई शेख-

स्वाभिमानी संपादक सेवा संघ प्रणित स्वाभिमानी प्रसार माध्यम समुहातील नवोदित संपादकांसाठी श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रं १, कॉलेज रोडवरील समता कार्यालयात रविवार दि.४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित संपादकांसाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.या मिटिंगमधील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत,

१) सध्या प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून वर्तमानपत्र प्रोसेस मध्ये करण्यात आलेले बदल तथा नवीन प्रोसेसची माहिती.

२) वर्तमानपत्र वार्षिक विवरण,आणी वार्षिक विवरण न भरल्याबद्दल आकारण्यात आलेला दंड,

३) वर्तमानपत्र डीटीपी व छपाई यासोबतच ई- पेपर्स, न्यूज पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स आदि नवीन व सर्व्हिसेस या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच ज्या कोणी नवोदित संपादकास स्वाभिमानी प्रसार माध्यम समुहात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांस समावून घेतले जाणार आहे.तसेच कोणाला पत्रकारिता क्षेत्राची आवड असल्यास त्यांनाही आपल्या स्वतःचे प्रसार माध्यम सुरु करावेसे वाटत असल्यास याबाबत त्यांंना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्याकरीता अधिकाधिक नवोदित संपादकांनी या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आवर्जून उपस्थित रहावे असे स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टीप:
सदरील मिटिंगमध्ये येणार असल्यास समता कार्यालयाच्या 9403199396 या क्रमांकावर पुर्वकल्पना देणे आवश्यक आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे