श्रीरामपूर

सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा लेखाजोखा

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा पत्र प्रपंच खऱ्या अर्थाने आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते “शौकतभाई शेख” यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे,
त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले सन १९८५ / ८६ साली एका साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले सन १९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली.सध्या दै.साईलिला टाईम्स, दैनिक विदर्भ सत्यजित, दैनिक जलभूमी, दैनिक नगरशाही, साप्ताहिक भवानीमाता, साप्ताहिक समतादूत, मोहसिन ऐ मिल्लत, वृक्ष संवर्धन, वृत्त नगरी, साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस, खरे सव्वाशेर
,साई गंगा,आदी अनेक वर्तमानपत्रात मार्गदर्शक संपादक म्हणून त्यांना मानाचं स्थान दिले जात आहे ही त्यांच्या ४० वर्षाच्या पत्रकारीतेतील कार्याची पावतीच होय,असे आजवर त्यांनी विविध प्रसार माध्यमातून सामाजाभिमुख पत्रकारिता केली आहे,तसेच त्यांच्या समता फाऊंडेशन आणि इतरही विविध सामाजिक सेवाभावी संस्था, संघटनेच्या माध्यमातून ते अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत असतात, स्वाभिमानी संपादक सेवा संघ या त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक नवोदित पत्रकार,संपादकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहेत, त्यांचा नेहमीचा शांत आणी हस्तमुख स्वभाव,यासोबतच सातत्याने बोलण्यातून आपलेपण जाणवत असल्याने जो कोणी त्यांच्या संपर्कात आला तो कायमचा त्यांचाच झाला, असे त्यांचे निरर्पेक्ष आणी परोपकारी व्यक्तीमत्व असल्याने राज्यभरात त्यांनी शैक्षणिक साहित्यिक,सांस्कृतिक, पत्रकारीता क्षेत्रासह शासकीय,प्रशासकीय, निमशासकीय क्षेत्रात देखील मोठा मित्र परीवार जोडला आहे. अशा या दिलदार मित्राच्या वाढदिवसा निमित्ताने आमच्या त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

✍🏻लेखक -डॉ.सलिम शेख
बैतूश्शिफा हॉस्पिटल आणि मित्रपरीवार,श्रीरामपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे