ह.सैलानी बाबा दर्गाहाचे मुजावर जुबेर बिनसाद बाबा यांचे निधन

श्रीरामपूर प्रतिनिधी (शौकतभाई शेख)-
येथील हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्टचे विश्वस्त आणी दर्गाह चे प्रमुख मुजावर जुबेर अवद बिनसाद (उर्फ सैलानी बाबा) यांचे बुधवार दि.३१ जुलै २०२४ रोजी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले, त्यांचे मृत्यू समयी वय ३४ वर्ष होते.तसेच ते तिरंगा न्यूज,बिनदास न्यूज चे संपादक असलम बिनसाद, मोटार वाहन व्यावसायिक सलिम बिनसाद,अब्बू बॅग हाऊसचे संचालक कलीम बिनसाद यांचे ते बंधू होते. सदैव हस्तमुख स्वभाव,कधी कोणाशी वाद विवाद नाही, नेहमी कोणत्याही गरजवंतांच्या हाकेला धावून जाणारे आणी सर्वांच्या कामी येणारे असे अजातशत्रू व्यक्तमत्व असलेले जुबेर भाईंनी हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट च्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक/ शैक्षणिक / अध्यात्मिक अशी विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत, सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अशा समाजसेवकाचे अचानक निधन झाल्याने श्रीरामपूर शहराच्या सामाजिक क्षेत्रासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा हजरत सैलानी बाबा दर्गाह जवळ, वॉर्ड क्र. ३ श्रीरामपूर या त्यांच्या राहत्या निवासस्थान पासून निघून वॉर्ड क्र.१ कॉलेज समोरील मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी शहर ए काझी मौलाना अकबरअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज ए जनाजा पठण करण्यात येवून सायं ५.३० वाजता त्यांच्यावर दफनविधी करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,५भावंडे असा परिवार आहे.