समतादूत विशेषांकाचे आमदार लहु कानडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात मोहसिन शौकत शेख संपादित समता दूत या विशेष अंकाचे प्रकाश श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार लहू कानडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समतादूत या अंकाचे प्रकाशन सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला यावेळी समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकत भाई शेख, मा.नगरसेवक अशोक (नाना) कानडे, समतादूत चे संपादक मोहसीन शौकत शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, नदीमताज, मुश्ताकभाई शेख, इब्राहिमभाई शेख,सरताज शेख, इब्राहिम बागवान सर,ज्येष्ठ पत्रकार सलाऊद्दीन भाई शेख,
दिलीप शेंडे सर, सौ.सुनंदाताई शेंडे मॅडम, अफजल मेमन आदी मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार लहू कानडे म्हणाले की, समतादूत हे नांव वर्तमान पत्रास मिळावं ही मोठी भाग्याची बाब आहे,
समता प्रस्थापित करण्याची कामे ही मोठी जिकरीची असतात, कारण विषमते विरुद्ध समता असते, समाजात समता प्रस्थापित व्हावी याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.समता प्रस्थापित करण्यासाठी मोठमोठी विजारवंत थोर महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवनपणाला लावले आहेत म्हणून लोकशाही रुपाने आपण आज समता बघत,जगत आणी उपभोगत आहोत हे त्याचेच गोड फळ आहे, आपल्या या समतादूत वर्तमानपत्रांतून देखील सर्वांना समान न्याय मिळावा, सामाजातील रंजले,गांजले उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे प्रश्न सोडविण्यासाठीचा पुढाकार समतादूत या अंकाने घ्यावा तसेच या विशेषांकास आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच,यासोबतच यापुढे देखील जी काही मदत हवी असेल अशा वेळी मी आपल्या सोबत असेल असे शेवटी आमदार कानडे शेवटी म्हणाले यानंतर उपस्थित मान्यवरांशी हितगुज साधत असतांना समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख म्हणाले की, गत ३५ ते ४० वर्षां पासून आपण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे नवोदित संपादक/ पत्रकारांच्या विविध समस्यांना चालना मिळण्या कामी आपण स्वाभिमानी संपादक सेवा संघ या संपादकांच्या राज्यव्यापी संस्थेची १० वर्षांपूर्वीच स्थापना केलेली असून या संघटनेच्या माध्यमातून नवोदित संपादक/ पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे तसेच या संघटनेचे राज्यभरात अनेक सदस्य नोंदणीकृत झालेले आहे त्याचबरोबर राज्य भरात विविध ठिकाणांहून शंभरहून अधिक नियमित प्रसार माध्यमे सातत्याने सुरु असल्याने त्यातीलच एक समतादूत प्रसार माध्यम असल्याचे शौकत भाई शेवटी म्हणाले.या प्रसंगी संपादक मोहसीन शौकत शेख यांनी समतादूत वर्तमानपत्र विषयक आपली भुमिका विषद करताना सांगितले की, समता दूत हे वर्तमानपत्र हिंदी व मराठी या दोन भाषेमध्ये असल्याने यामध्ये विचारवंत साहित्यिकांचे समतेला पोषक सामाजप्रबोधनात्मक
लेख हे अग्रस्थानी असणार आहेत,तसेच सामाजास पोषक अशा प्रबोधनात्मक लेख तसेच शहरातील ठळक घडामोडी बातम्यांच्या माध्यमातून समाजा समाजात जनजागृती आणी एकोपा निर्माण होवून एकतेची भावना निर्माण व्हावी,ज्यामुळे सामाजासह देशाचा विकास घडू शकेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचे मोहसीन भाई आपल्या मनोगतात शेवटी म्हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित असलेले अरुण पाटील नाईक, सचिन जगताप,अशोक भोसले, सरपंच कार्लस साठे, प्रमोद संसारे,राजेंद्र कोकणे, बंडू बोडके, बंडू कोकणे, राजेंद्र कोकणे, श्रीधर गाढे, शरद नन्नवरे, सतीश बोर्डे,आशिष शिंदे,हरिभाऊ बनसोडे, अमोल आदिक, नामदेव पाटील आदिक, ऍड.मधुकर भोसले,पी.एस.निकम सर, रवी अण्णा गायकवाड, अविनाश काळे,भाऊसाहेब तोरणे, संतोष गायकवाड निशिकांत पंडित,पत्रकार दिपक कदम आदि मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.