श्रीरामपूर

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारणीचे पुनर्गठन संपन्न

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ.हरीश रावलिया रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड.सुभाष जोंजाळे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्यानगर जिल्हा उत्तर विभागाची कार्यकारिणीचे पुनर्गठन शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेच्या श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्ध विहारांमध्ये सोसायटीचे ट्रस्टी डॉ.राजाराम बडगे, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक केदारे,राज्य संघटक तथा नाशिक विभागाचे पालकमंत्री गौरव पवार यांच्या निवड समितीने गुणवत्तेनुसार पारदर्शक आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया संपन्न केली. तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी पदउतार होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांनी आपल्या कार्यकाळातील सोळा मुद्द्यांचा कार्य व आर्थिक अहवाल सादर केला. साधू कार करत सर्वांनी तो एकमताने मंजूर केला.अशोक बोरुडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्षा विशाखा निळे वैशाली अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी,मान्यवर‌ याप्रसंगी उपस्थितीत होते.‌यावेळी डॉ.राजाराम बडगे, भिकाजी कांबळे, अशोक केदारे, गौरव पवार आदींनी उपस्थित बौद्धचार्यांना संस्थेबाबत माहिती तसेच पदाधिकाऱ्यांचे कामाचे स्वरूप संस्था वाढवण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले तसेच दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सोसायटीचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड. सुभाष जोंजाळे तसेच ट्रस्टी चेअरमन डॉ.हरीश रावलिया व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे एक दिलाने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने मैत्री भावाने काम करतात अशाच प्रकारचे काम जिल्हास्तरावरीही आणि जनमानसात मैत्री भावनेने आपण सर्वांनी काम करावे तसेच विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाची शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनी अंमलबजावणी करावी.तसेच याप्रसंगी अशोक केदारे मार्गदर्शन करताना म्हणाले की ही निवड प्रक्रिया संपूर्ण लोकशाही पद्धतीने अगदी पारदर्शक होणार आहे तसेच संस्थेची घेतलेली प्रशिक्षणे, शिक्षण, संस्थेतील प्रशासकीय कामाचा अनुभव, संस्थेच्या गरजेनुसार कोणत्याही पदावर काम करण्याची मानसिकता अशा सर्व निकषांचा विचार करून पुनर्गठन करण्याची भूमिका घेतली तर महाराष्ट्राचे प्रभारी भिकाजी कांबळे यांनी महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ८ गोल्डन पॉईंट अभियानाचा सारांश उपस्थित बौद्धाचार्यांना समजावून सांगितला तसेच सर्व आंबेडकरी आणि बौद्ध विचारांचे संघटन तसेच मंडळे यांना सोबत घेत संविधान समर्थक समाज जोडण्याची गरज याप्रसंगी निरीक्षकांनी यावेळी बोलून दाखवली तसेच आत्ता पर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी पुनर्गठनातील विक्रमी उपस्थिती आज अहिल्यानगर येथे दिसून आल्याने त्यांनी सर्व उपस्थितांचे कौतुक केले.

नवनिर्वाचित कार्यकारिणीची नावे :-

• जिल्हाध्यक्ष : शांताराम रखमाजी रणशूर

 

• सरचिटणीस : नरेंद्र हरिभाऊ पवार

 

• कोषाध्यक्ष : नानासाहेब रामभाऊ बनकर

 

• उपाध्यक्ष (संस्कार) : संदीप ताराचंद त्रिभुवन

 

• उपाध्यक्ष (प्रचारव पर्यटन): गौतम जयाजी पगारे

 

• उपाध्यक्ष (संरक्षण) : आतिश बाबासाहेब त्रिभुवन

 

• हिशोब तपासणीस : विजय हरिभाऊ जगताप

 

• कार्यालयीन (सचिव) : लक्ष्मण नामदेव म्हस्के

 

• सचिव (संस्कार विभाग): प्रदीप संतू आढाव, विजय सखाराम भोसले

 

• सचिव (प्रचार व पर्यटन): रावसाहेब सखाहारी पराड, कैलास चोखा लोखंडे

 

• सचिव (संरक्षण) : रवींद्र दत्तू जगताप, अण्णासाहेब लक्ष्मण जगताप

 

• संघटक (संगमनेर प्रभारी): विश्वास किसन जमधडे,

 

• संघटक (नेवासा प्रभारी): रमेश दिनकरराव निकम

 

• संघटक (राहाता प्रभारी) : भीमराव सखाराम कदम

 

• संघटक (अकोला प्रभारी) : सुरेश भिकाजी देठे

 

• संघटक (राहुरी प्रभारी): चंद्रकांत प्रभाकर संसारे

 

• संघटक (श्रीरामपूर प्रभारी) : अशोक केरू बोराडे

 

• संघटक (कोपरगाव प्रभारी): बिपिन चंद्रभान गायकवाड

 

• कायदेविषयक सल्लागार : चंद्रकांत जाधव, अॅड. अण्णासाहेब भागवत

 

यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर उपस्थितांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले की बौद्ध व बहुजन समाज यांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया आमची नवनिर्वाचित कार्यकारणी अहोरात्र मेहनत घेऊन काम करेल तसेच कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि निवड न झालेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी मी स्वतः अध्यक्ष असल्याचे समजून संविधान समर्थक समाज जोडावा तसेच संघटन बांधणीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करून अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आणतील अशी भावना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी व्यक्त केली. यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील श्रामणेर बौद्धाचार्य याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे