कोपरगाव तालुक्यात बारावीची परीक्षा शांततेत सुरू

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरासह तालुक्यातील केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी शांततेत पहिला पेपर सुरू झाला. यावेळी अनेक केंद्रावर विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या परीक्षेत पुणे विभागाने काही निकष लावले आहे यामध्ये कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स यंत्र विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हॉल तिकीट, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, छोटी स्केल असे साहित्य आठवण करून घेऊन जावे परीक्षेला जाताना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचाल याची काळजी घ्यावी तसेच परीक्षेला जातांना हलके अन्न घेऊनच परीक्षेला जावे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपड घेऊ नये अभ्यास करत असताना दैनंदिन व नियमित असलेला अभ्यास करावा जास्त जागरण करू नये हॉल तिकिटाची एक झेरॉक्स प्रत घरी काढून ठेवावी यदा कदाचित समजा हॉल तिकीट हरवल्यास घाबरून जाऊ नका आपल्या कॉलेजशी व प्राचार्यांशी संपर्क करून याबाबत परीक्षा केंद्रावर माहिती द्यावी तसेच पेपर लिहीत असतांना एकाग्र व मन शांत ठेवून पेपर लिहावा घरी गेल्यानंतर झालेल्या पेपरवर चर्चा करू नका शांतपणे जेवण करून काही काळ विश्रांती घ्या त्यानंतर पुढच्या पेपरची तयारी करा परीक्षेसाठी रात्री अपरात्री जागरण करू नका पेपर झाल्यानंतर किती गुण मिळतील कसा लिहिला याबाबत जास्त विचार करू नका तसेच परीक्षेला जातांना येतांना उन्हाची काळजी घ्या. चांगला अभ्यास करा यश तुमचेच आहे.