रेड क्रॉस ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार -किरण सावंत पाटील (प्रांताधिकारी)

श्रीरामपूर प्रतिनिधी / शौकतभाई शेख
जागतिक स्थरावर रेड क्रॉस सोसायटी मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.नागरिकांचे आरोग्य सुलभ व निरोगी ठेवण्यासाठी जगातील रेड क्रॉस स्वयंसेवक समर्पित वृत्तीने कार्य करत आहेत. श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटी तर्फे दरवर्षी आषाढी दिंडीला जाणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींना आरोग्य सुविधा देणार असून जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागात रेड क्रॉस सोसायटी आरोग्यविषयक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉसचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध,घोषवाक्य, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रांताधिकारी किरण सावंत यांचे शुभ हस्ते करण्यात आला त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. संस्थेचे सचिव सुनील साळवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कु.श्रुतिका गणेश निद्रे,द्वितीय कु.कार्तिकी सचिन चंदन,तृतीय कु. दिपाली तानाजी पाटील यांनी पटकावले तर घोषवाक्य स्पर्धा प्रथम-कु.वैष्णवी केदार, द्वितीय -ओमकार गणेश पवार, तृतीय – हितेन चंद्रशेखर गायकवाड, यांनी पटकावले तसेच रांगोळी स्पर्धा रांगोळी स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट रांगोळी कु.सृष्टी किरण सोनवणे आदींना सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र, व रोख रक्कम देवून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,उपाध्यक्ष तहसीलदार मिलिंद वाघ, सचिव सुनील साळवे, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके,श्रावण भोसले,सुरेश वाघुले,सचिन चंदन,गोरक्षनाथ बनकर, सुखदेव शेरे,विश्वास भोसले, अवधूत कुलकर्णी,संजय दुषींग,विनोद हिंगनिकर,माया चाबुकस्वार,पुष्पा शिंदे, निर्मला लांडगे,किमया चंदन आदींनी परिश्रमघेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला लांडगे यांनी केले तर आभार प्रवीण साळवे यांनी मानले.