राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे कोपरगाव सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या काळात तरुणांना मोठी संधी दिली जात आहे राजकीय क्षेत्रात नवतरुण आल्यास समाजाचा मोठा कायापालट होईल सामाजिक क्षेत्रामध्ये गौतम भाऊ बनसोडे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे यांनी घेऊन त्यांनी नुकताच कोपरगाव शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी गौतम भाऊ बनसोडे यांच्यावर सोपवली तसेच नुकताच गौतम भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस शहरामध्ये विविध उपक्रम साजरे करून संपन्न झाला सकाळपासूनच गौतम भाऊ यांच्या निवासस्थान कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच
तहसील कार्यालयातील अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची रीघ लागली होती. तसेच सायंकाळी श्री साईबाबा तपोभूमी शेजारी असलेल्या साईबाबा हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी देखील अनेक मान्यवरांनी भेट देऊन गौतम भाऊ बनसोडे यांचा सत्कार केला. तसेच गौतम भाऊ यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई बनसोडे यांनी देखील गौतम भाऊंना आशीर्वाद दिले याप्रसंगी त्यांच्या पत्नी तनुजा ताई बनसोडे मुलगी आम्रपाली बनसोडे तक्षशिला बनसोडे गौतमी बनसोडे अभिषेक बनसोडे यांच्यासह परिवारातील सर्व नातेवाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.