राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या कोपरगाव सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील गोदाकाठी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे कोपरगाव शहराध्यक्ष गौतमराव बनसोडे यांच्या हस्ते कोपरगाव येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्वेटर चे वाटप करण्यात आले याप्रसंगी कार्याध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास तसेच संविधानाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.