राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कोपरगाव शहराध्यक्ष पदी गौतम बनसोडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गौतम बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गौतम बनसोडे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता तसेच अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲडवोकेट संदीप वर्पे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. खऱ्या अर्थाने गौतम बनसोडे हे ॲडवोकेट संदीप वर्पे यांचे निकटवर्तीय असून ते ॲडवोकेट वर्पे यांना गुरुस्थानी सन्मान देतात व ते करत असलेल्या त्यांच्या कामावर खुश होऊन गौतम बनसोडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षा मध्ये प्रवेश केला असता ॲडवोकेट वर्पे यांनी त्यांच्यावर कोपरगाव शहराची जबाबदारी देऊन त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले आहे याप्रसंगी नवनिर्वाचित सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते आदरणीय ॲडवोकेट संदीपजी वर्पे यांनी कोपरगाव शहराच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली आहे या संधीचे मी नक्कीच सोने करीन तसेच कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे यांनी यावेळी सांगितले तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांची बनसोडे यांनी आभार व्यक्त केले.