महंत शारदानंद गिरी माताजींनी गौतम बनसोडे यांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा अधिक श्रावण असल्याने काहीसा उशिरा आला आहे रक्षाबंधनाला बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणार हे एक प्रतिकात्मक चिन्ह मानलं जातं याचाच एक भाग म्हणून महंत शारदानंद गिरी माताजी यांनी नुकतीच कोपरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतमराव बनसोडे यांच्या निवासस्थानी माताजींनी अचानक पणे भेट दिली असता संपूर्ण बनसोडे परिवारात एक आनंद उत्सव साजरा झाला
अचानकपणे महंत शारदा नंदगिरी माताजींनी निवासस्थानी भेट दिल्यामुळे बनसोडे कुटुंबाला आनंदाचा धक्का बसला त्यातच माताजींनी गौतमराव बनसोडे यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले याप्रसंगी गौतमराव बनसोडे यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई बनसोडे पत्नी तनुजा ताई बनसोडे मुलगी आम्रपाली बनसोडे, तक्षशिला बनसोडे, गौतमी बनसोडे, अभिषेक बनसोडे, गौतमी बनसोडे आदी यावेळी निवासस्थानी उपस्थित होते माताजींनी अचानकपणे निवासस्थानी भेट दिल्याने संपूर्ण बनसोडे परिवार आनंदाने भारावून गेला होता यावेळी माताजींनी सर्वांना आशीर्वाद दिले. अशाप्रकारे एक अनोख्या पद्धतीने बनसोडे परिवारात मध्ये एक दिवस अगोदर रक्षाबंधन साजरा झाला.