धर्मयोध्दा भिमराव बडदे शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिक- महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणारे धर्मयोध्दा भिमराव बडदे शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान, कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी एका कार्यक्रमात केले.धर्मयोध्दा माजी खासदार ॲड कै.भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण व महाराष्ट्र प्रांत आणि बडदे परिवार यांच्या वतीने धर्मयोध्दा माजी खासदार भिमराव (नाना) बडदे यांची ७७ व्या जयंतीच्या निमित्ताने गोशाळा मदत तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, व फळझाडांचे वितरण अश्या या कार्यक्रमाचे आयोजन गोदातीर कोपरगांव येथील श्री क्षेत्र दत्तपार येथे करण्यात आले होते. या प्रसंगी श्री दत्त, प्रभू श्रीराम यांचे पुजन करून धर्मयोध्दा माजी खासदार भिमराव नाना बडदे यांचे प्रतिमेचे पुजन महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर संत पुजन करुन श्री राघवेश्वर देवस्थान येथील गो-शाळेला धर्मयोध्दा माजी खासदार ॲड कै. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण महाराष्ट्र प्रांत वतीने मदत करण्यात आली. तसेच गो-ग्रास मतपेटीचे वितरण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी झाडांचे आणि फळांचे रोप वितरण,माजी खासदार भिमराव नाना बडदे यांचे तत्कालीन सहकारी तसेच भारत सरकारने नियुक्त केलेले नोटरी यांचा स्नेहवस्र आणि फळझाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज,भाग्यश्रीताई बडदे, ज्येष्ठ नेते टेकचंद खुबाणी,रामदास खैरे,कोपरगांव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोक वहाडणे, बी.एस.एन.एल.चे संचालक ॲड.रविकाका बोरावके, संत रामदासी भक्त मंडळाचे शरद नाना थोरात, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पाठक, तालुका संघचालक सुरेश विसपुते,
श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त ॲड. संजय भोकरे,प्रकाश सवई,महावीर दगडे,रंगनाथ खडांगळे,कैलास सुर्यवंशी,प्रमोद पाटील,अनिल वायखिंडे,सतिष चव्हाण,विजय जोशी, माजी नगरसेविका भारतीताई वायखिंडे, रविंद्र आगलावे, कैलास खैरे,सेवा निवृत्त प्राचार्या लताताई भामरे, राष्ट्रसेविका मनिषा बारबिंड,भारत सरकारचे नोटरी ॲड.महेश भिडे,ॲड.ज्योती भुसे,ॲड. शितल(बलकवडे)देशमुख,ॲड.संजय जाधव,ॲड.योगेश खालकर,ॲड.उत्तम पाईक,ॲड.अनुप ठोळे,ॲड.रमेश नागरे,ॲड.शिरीष लोहकणे,रत्ना पाठक, किरणभाभी दगडे, सुधाकर जाधव, नामदेव बडदे, बाळासाहेब बडदे, सुनिता बडदे, धनंजय बडदे, अनिल बडदे आदींचा सन्मान स्नेहवस्र आणि धर्मयोध्दा स्मृती वृक्ष देवून करण्यात आला.या प्रसंगी उपस्थितांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण परिवाराला अतोनात छळ आणि संघर्षाला सामोरे जावे लागले होते.अशा काही यातना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करतांना आणिबाणी काळात एकच कुटुंबातील सर्व व्यक्ती १८ महिने जेल मध्ये ठेवल्याचे बडदे कुटुंब हे राज्यातील एकमेव उदाहरण होते. बडदे परिवारावर हे संकट कोसळले होते. मिसाबंदी जेल मधून परतल्यावर खचून न जाता धर्मयोध्दा भिमराव नाना बडदे यांनी राष्ट्र सेवेचे कार्य पुढे सुरू ठेवले.पतितपावन संघटना,कोपरगांव शहराचे पहिले पाणी आंदोलन,जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलन,अशा त्यांच्या असंख्य आठवणींना उजाळा उपस्थितांनी दिला.याप्रसंगी सुशांत घोडके यांनी भिमराव नानांचे स्मृती निमित्ताने वितरीत फळझाड हे संवर्धन करा. झाडाचे निमित्ताने त्यांची आठवण आणि कार्य हे उर्जादेवून जाईल.असे सांगितले.यावेळी माजी खासदार भिमराव नाना बडदे यांचे स्नेही हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपालपदी नियुक्त झाल्या बद्दल अभिनंदनाचा ठराव धर्मयोध्दा माजी खासदार ॲड कै.भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण महाराष्ट्र प्रांत यांचे वतीने घेऊन सर्वांनी टाळ्या वाजवून संमती दिली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले तर आभार बाळासाहेब बडदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बडदे,रविंद्र आगलावे,जय नवले,आदित्य देशमुख,अनिल बडदे, धनंजय बडदे यांचे सह धर्मयोध्दा माजी खासदार ॲड कै.भिमराव नाना बडदे स्मृती प्रतिष्ठाण महाराष्ट्र प्रांत यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुमंत्र आणि वंदेमातरम् यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.