चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीने कोपरगावकरांनी लुटला आनंद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव शहरातील जुने गावठाण भागात ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिरात विविध शाळांच्या बालगोपाळांच्या दिंडी आगमनाचे विठूचा गजर करत परिसर दुमदुमला आषाढी एकादशीच्या पुर्वदिनी कोपरगांव शहरातील शिशु विकास मंदिर,विद्या प्रबोधिनी शाळा, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम स्कूल,एम.के.आढाव विद्यालयाने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी दिंडीचे मराठा पंच मंडळ ट्रस्ट कोपरगांवचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने दिंडीचे पुजन करून बालगोपाळांना खाऊ वाटप करत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मराठा पंच मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.संजय भोकरे, विश्वस्त बाळासाहेब नरोडे, प्रकाश गवारे,मंदार आढाव,कारभारी नजन, रोहित वाघ,साई नरोडे,कैलासआढाव,सेवेकरी भास्कर ठोंबरे, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापक नारायण अग्रवाल,जयंत विसपुते,श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, सचिन मोरे, एम.के.आढाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भावना गवांदे(खैरनार), जयश्री आहेर,गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या सदस्या,शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठा पंच मंडळ ट्रस्टचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विठ्ठल-रुख्मिनीचे मंदिर आहे.
विठ्ठलभक्त ह.भ.प. बाबुराव नरोडे महाराज यांनी असंख्य भाव-भक्ती गीते याच मंदिरात गायली आहेत.त्यांच्या भक्ती भजनाचे कर्णमधुर स्वर आकाशवाणी केंद्रावर उमठले. त्यांना ‘रेडिओस्टार’ हा किताब बहाल झाला.संत रामदासीबाबा हेही या मंदिरात येत असत. संगीतकार गायक आनंदराव आढाव यांनीही येथे सेवा दिली आहे. आजही येथे काकड आरतीची परंपरा आहे.यावेळी विविध शाळांच्या दिंडीत विठ्ठल,रुख्मिनी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत मुक्ताबाई, संत सोपान काका, संत निवृत्ती, संत एकनाथ,संत गोरोबाकाका यांचेसह विविध संत आणि वारकरी वेशभूषेतील मुले-मुली सहभागी झाले होते.हाती वारकरी भगवा झेंडा,डोक्यावर तुळस, गळ्यात टाळ आणि मुखी हरिनामाचा गजर करत शाळांच्या दिंड्या गावठाणात जमल्या.सर्व शिक्षा अभियान,स्वच्छता,वृक्षारोपण-पर्यावरण, बेटी बचाओ-बेटी पढाओ असे विविध सामाजिक संदेश फरक विद्यार्थ्यांचे हाती होते.या प्रसंगी आषाढी वारीचे महत्व,दिंडींची परंपरा मानव जातीला सामाजिक समरसता आणि भेदभाव निर्मूलनाचा संदेश देत असल्याचे विद्यार्थांनी केलेल्या मनोगतात व्यक्त केले. गोरक्षण महिला भजनी मंडळ यांनी भजन गायले.शहरात विविध ठिकाणी रिंगण सोहळा झाला.तसेच फुगडी,झांज, भक्ती गीतांवर तल्लीन होवून नृत्य सादर केले.गोदातीरावर पुराणकालीन ऋषी-मुनी, साधू-संत, राजे-महाराजे यांचे पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेल्या कोपरगांव भुमीत शालेय शिक्षणाचे माध्यमातून प्रथा आणि परंपरा जोपासण्याचा भावी पिढीने वारसा जपलेल्याबद्दल गांवक-यांनी कौतुक केले आहे.