के.बी.पी.प्राथ.शाळेच्या वतीने आषाढीच्या पूर्वदिनी वारकरी दिंडीचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त शाळेपासून ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायी दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.एम.खाडे यांनी पालखीतील विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्तीचे पूजन केले. तसेच त्यानी सर्व विद्यार्थ्यांना दिंडीसाठी शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल विठ्ठल नामघोष करत दिंडी निघाली.या दिंडीमध्ये विठ्ठल ,रखुमाई यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले.वारकऱ्यांच्या वेषात आलेल्या विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद लुटला. पालखी मंदिरात पोहोचल्या नंतर विद्यार्थ्यांनी मनोभावे दर्शन घेऊन टाळ वाजवत भजने म्हटली. विद्यालयाच्या शिक्षिका कुमावत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले.
त्यानंतर प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना केळी देण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख बडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका घुले मॅडम,शिंदे मॅडम,वलटे मॅडम,बडे मॅडम, पावले मॅडम,वाठारकर मॅडम, आदी उपस्थित होते.