अखेर घड्याळ चोरीतील ८ आरोपी जेरबंद;८ दिवसांचीच पोलीस कस्टडी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड लगत असलेल्या सचिन वॉच कंपनी या दुकानाचे शटर चादर गॅंगने तोडून आत मध्ये प्रवेश करून काचेच्या काउंटर मध्ये ठेवलेल्या टायटन कंपनीचे १५५ घड्याळ तसेच टायमेक्स कंपनीचे १२० घड्याळ असे एकूण २७५ घड्याळ या घड्याळांची बाजार भावा नुसार विक्री किंमत २९ लाख २२ हजार रुपये तर काउंटर मध्ये असलेली रोख रक्कम ३ लाख ४७ हजार रुपये असा एकूण ३२ लाख ६९ हजार रुपये किमतीचा माल व रोख रक्कमेची चोरी झाली होती याबाबत दुकानाचे मालक संजय लालचंद जैन यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी चोरीची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सदरचा गुन्हा तपासा कामे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे आदी पोलिसांचे एक पथक तयार करून आरोपी शोध कामी रवाना करण्यात आले होते याबाबत ३० एप्रिल २०२५ रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मधिल गुन्हा रजिस्टर क्रमांक १८९ /२०२५ या गुन्ह्याचा तपास करत असतांना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार राज्यातील असून त्यांच्या इतर ७ साथीदारांने हा गुन्हा केला असून सदर आरोपी हे सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर या परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळतात सदरच्या पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारघेत तेथे जाऊन शोध घेतला असता या गुन्ह्यातील १) सुरेंद्र जयमंगल दास, २) रियाज नईम अन्सारी ३) पप्पु बिंदा गोस्वामी ४) राजकुमार चंदन साह ५) राजकुमार बिरा प्रसाद ६) नईम मुन्ना देवान ७) राजकुमार किशोरी प्रसाद, ८) गुलशनकुमार ब्रह्मानंद प्रसाद हे सर्व बिहार राज्यातील असून ते राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी अशा ८ संशयीतांना ताब्यात घेतले असून सदर घटनेची पंचा समक्ष सदर आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून ९ लाख ८१ हजार रुपये किमतीचा टायटन, रागा टायटन, टाइमॅक्स कंपनीची १०० घड्याळे २ वायफाय राऊटर ७ मोबाईल असा एकूण १० लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

सदर आरोपींकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता सदरचा मुद्देमाल हा सुरेंद्र जयमंगल दास यांने ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी आरोपी क्रमांक ९ मोबीन देवान राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी बिहार हा फरार असून त्याने १२ ते १३ दिवसापूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळाचे शोरूम मध्ये चोरी केली असून सदरची चोरी करतांना त्याच्याकडील मोबाईल व राउटरचा वापर केल्याची माहिती सदर आरोपींनी सांगितली तसेच गुन्ह्यातील इतर मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता चोरीची काही घड्याळे ही मोबीन देवान यांच्या मार्फतीने आरोपी क्रमांक १०) मुकेश शहा राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी यांने सदरची घड्याळे हे चोरीचे आहेत हे सांगून कमी किमतीत विक्री केले असून काही घड्याळे मोबीन देवान याच्याकडे असल्याची माहिती आरोपींनी सांगितली याबाबत सदर आरोपींना कोपरगाव शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यांना कोपरगाव येथील माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.