कोपरगाव येथील चर्मकार व्यावसायिकांसाठी व्यापारी संकुल उभारण्याची मराठा भगिनींची मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरात नुकत्याच झालेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत गांधी चौक येथील अनेक वर्षांपासून असलेली चर्मकार व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली आहे.या विस्थापित झालेल्या चर्मकार बांधवांना कायम स्वरूपी व्यवसाय करता येईल अशा प्रकारे व्यापारी संकुल बांधून त्यांचे पुनर्वसन करावे. अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेला एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना करण्यात आले तसेच व्यापारी संकुल बांधतांना मात्र रहदारीस अडथळा ठरणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे बेकायदेशीर काम होणार नाही व पुन्हा चर्मकार व्यावसायिकांना विस्थापित होण्याची वेळ येणार नाही. याची दक्षता घेण्याचीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर मराठा समाजातीलविमल पुंडे (योग शिक्षिका), कमल नरोडे ,आरती गाडे, शिल्पा पवार, रोहिणी पुंडे , रूपाली महाडिक,स्वाती हासे, चंद्रकला नरोडे,पुष्पा जगताप सविता शिंदे,भारती साठे मंदा कोते, बेबी बोडखे,संगीता गायकवाड,आशा साळुंके, जोती सुर्यवंशी,चंद्रकला आहेर सुरेखा निकम,पुनम पाटील , सुमन खिलारी आदीसह अनेक महिला भगीनींच्या सह्या आहेत.