कोपरगाव शहर पुन्हा गोळीबाराने हादरले भर दिवसा गोळीबार एक गंभीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरात गुरुवार दि १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गोदावरी लहान पुलाकडे जाणाऱ्या ऐन वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याने कोपरगाव शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील गोदावरी नदी शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या रस्त्यावर दुपारी ४ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून ? गोळीबार झाल्याची घटना घडली असून यात एक ३६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
(बातमी उद्यावत होत आहे)