कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली तर भगवान मथुरे नवीन पोलीस निरीक्षक यांची नेमणूक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागेवर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे याबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी सायंकाळी सदर बदल्यांचे आदेश काढले आहे या बदली आदेशात जिल्हा अंतर्गत १६ पोलीस निरीक्षकांसह ११ सहाय्य पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शन सूचना व निर्देश विचारात घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये कोपरगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या रिक्त पदावर सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष परशराम शेळके यांची नेमणूक करण्यात आली आहे याबाबत जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळांने नेमणुका/ बदल्या करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे त्यानुसार या बदल्याचे आदेश सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहे.