कोपरगाव शहर पोलीस स्टेशन

तिळवणी गावाजवळ जोडप्यास अडवून सोने व मोबाईल चोर अखेर जेरबंद

0 5 7 2 9 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील तिळवणी गावाजवळील मार्केट कमिटीच्या जवळ मंगळवार दिनांक ६ मे २०२५ रोजी रात्री २१.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी संदीप रामदास बोळीज व त्यांच्या पत्नी वैजापूर कडून कोपरगाव कडे येत असतांना २ मोटरसायकल वरून ४ अनोळखी चोरटे वय साधारण २० ते २५ वर्ष यांनी हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून संदीप बोळीज यांच्या पत्नीच्या अंगावरील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल १.५ ग्रॅम वजनाची सोन्याचे कर्णफुले व रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच एम आय कंपनीचा सेवन प्रो मोबाइल असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने दमदाटी करून चोरून नेला होता याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी फिर्याद १४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमानुसार ३०९(४),३(५) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली होती त्या अनुषंगाने सदर घटनेतील आरोपी बद्दलची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता त्या अनुषंगाने सदरचे पथक १४ मे २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असतांना सदरचा गुन्हा राहुल केदारनाथ लोहकणे रा. कोकमठाण यांने त्याच्या साथीदारांमार्फत सदरचा गुन्हा केला असून तो सध्या कोकमठाण चौफुली येथे असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोकमठाण चौफुली येथे जाऊन सदरचे संशयित इसम यांचा शोध घेऊन राहुल केदारनाथ लोहकणे वय २० वर्ष रा.कोकमठाण कुणाल अनिल चंदनशिव वय १९ वर्ष राहणार संवत्सर निलेश बाळासाहेब भोकरे वय १९ वर्ष रा. संवत्सर प्रमोद कैलास गायकवाड वय १९ वर्ष रा. संवत्सर आणि १ विधी संघर्षित बालक त्याचे वय १७ वर्ष रा. सडे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले मोबाईल असे एकूण ६ मोबाईल बजाज प्लेटिना कंपनीची विनाक्रमांकाची मोटरसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींना पुढील तपास करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 2 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे