महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र दिन व कामगार दिन कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय संस्था याठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. कोपरगाव तहसील कार्यालयात देखील आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र दिन हा आपल्या राज्याच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि एकतेचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, पौराणिक, समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. हे बलिदान सार्थ ठरविने आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्राकडे देशातील प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या अधिक बळकट करण्यासाठी काम करणे गरजेचे असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे योगदान सातत्याने देत राहीन. युवकांनी शिक्षण, नवनवीन कल्पना व कौशल्याच्या जोरावर पुढे येऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी याप्रसंगी करून महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, कैलास ठोळे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, विजयराव वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.